
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – समाजातील गरीब अनाथ निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्ती यांना उपजीविका करण्याचा उदेशाने शासनाकडून विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यात येऊन अनुदान चे मासिक वाटप करण्यात येते परंतु आता १५ दिवसावर दिवाळी येऊनही अजूनही जळपास ३ ते ४ महिन्याचे अनुदानाचे वाटप करण्यात आले नाही त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालयाच्या व बँकच्या चकऱ्या मारीत आहे मात्र खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे आल्या पाऊली परत जावे लागत आहे त्यामुळे श्रावणबाळ व निराधार योजनेचे अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे.
अन्यथा तहसिलदारच्या कॅबीनमध्ये स्वतःला कोंडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार सेवक विनोद उमरे, नारायण निखाडे मुरलीधर रामटेके यांनी दिला यावेळी निवेदन सादर करताना उपस्थित प्रहार सेवक सत्यपाल गजभे,स्वप्नील खोब्रागडे, रमेश वाकडे आदी उपस्थित होते.