Breaking News

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या कक्षाला भीषण आग

अहमदनगर :-आज दिनांक 6 /11/2021 रोजी 10:30 वाजताच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या कक्षाला भीषण आग लागुन दहा जणांचा मृत्यू पावल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून या अतिदक्षता कक्षात साधारण 20 ते 25 रुग्ण उपचार घेत होते.

रुग्णालयला भीषण आग लागल्यामुळे परिसरात परिस्थिती तनावपूर्ण झाली, काही वेळातच अग्निशामक दलाचे गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्याने इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या अतिदक्षता विभागात धाव घेतली आणि रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले असून संपूर्ण अतिदक्षता कक्ष जळून खाक झाले आहे.

या भीषण अग्रितांडवात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व रुग्ण वयोवृद्ध आणि व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्यानंतर त्यांना शिफ्ट करत असताना त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले, कॅम्प पोलीस स्टेशनचे शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल आहेत. आता या आगीचे नेमके काय कारण हे तपासात समोर येईल पण आपल्या शेवटच्या मोजत असलेले रुग्ण मारण्याआधीच जिवंत जाळल्या गेले हे सर्वात जास्त दुःखद बाब आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved