
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिसी : – चिमूर तालुक्यातील घटना दिनांक १४/११/२०२१ रोजी दुपारचे १२:०० वाजताच्या सुमारास मौजा शंकरपुर येथील पीडित महिला शेतात रोजमजुकरीता कापुस वेचण्यासाठी पायदळ पादण रस्त्यांनी एकटीच जात असतांना शंकरपुर येथील आरोपी अमोल बंडु नन्नवरे वय २९ वर्षे राहणार शंकरपुर यांने सदर पीडित महिलेला रस्त्यावर आडवा होऊन तिचे दोन्ही हात पकडुन तिला बळजबरीने मारहाण करून स्वःताच्या पराउटीचे शेतात फरपटत घेवून गेला.
व पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आरोपी अमोल बंडु नन्नवरे राहणार शंकरपुर यांनी बलात्कार केला असे पीडित महिलेच्या रिपोर्ट वरून पोलीस ठाणे भिसी येथे आरोपी अमोल बंडु नन्नवरे राहणार शंकरपुर यांच्या विरुध्द अपराध न. 219/21 कलम 376 341 323 506 भा. द. वि. चा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस पोलीसांनी त्यांच्या शेतातुन अटक केली, असुन पुढिल तपास पो. उप. नि. सचिन जंगम हे करीत आहे