तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख-शेवगांव
शेवगांव:-शेवगांव सायकलिंग क्लब चे सदस्य कर्तव्य दक्ष महसुल चे अधिकारी अमरावती चे तहसीलदार यांनी स्वतःच्या हिमतीवर नुकत्याच आयोजित केलेल्या कश्मिर ते कन्याकुमारी अशी सायकलींग रेस (3651KM.) आयोजीत करण्यात आली आहे या स्पर्धेत आपली चार जणांची टीम उतरउन काकडे कमाल केली विशेष म्हणजे काकडे साहेबांनी सर्वसामान्य अशा लोकांना बरोबर घेवुन त्यांना स्वखर्चाने टीम तयार केली आहे यामध्ये गरीब घरातील एक विद्यार्थी एक मेकॅनिक एक तलाठी अशी चार जणांची टीम तयार केली व एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
भारतात होणारी ही स्पर्धा जिंकली तर ते अमेरीकेला होणार्या सायकल स्पर्धेसाठी त्यांच्या टीमची निवड होणार आहे म्हणुणच नुकताच त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा योग आला काल महाराष्ट्र मंडळ गुरुग्राम दिल्ली यांच्या कार्यकर्त्यांना आला काल दुपारी व्हाटसप गृपवर टाकलेल्या एका मेसेजला प्रतिसाद देवून आपले मार्गदर्शक उद्योजक विष्णू पाटील व मा.अध्यक्ष मनोज खरड गंगाधर गुंडे शांताराम उदागे संतोष सवालखे गिरीश शर्मा व यशवंत चौधरी हे आपल्या व्यस्त वेळेतुन वेळ काढुन दिल्ली जवळील गुरुग्राम येथे या छोट्याश्या सन्मान सोहळ्याला हजर होतें तसेच काकडे साहेब व त्यांच्या टीमला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
ताजा कलम
1 मार्च रोजी जम्मू कश्मिर येथुन सुरु होवून 3651की मी 12 जम्मु कश्मिर हीमाचल पंजाब हरियाणा दिल्ली उत्तरप्रदेश राजस्थान मध्य पदेश छत्तीसगड तेलगांना आध्र परदेश तमिलनाडु राज्यातुन प्रवास करत 8 मार्च रोजी कन्याकुमारीला समारोप होईल यामध्ये महाराष्ट्राचे संतोष काकडे सर कृष्णा मोहकर विद्यार्थी, अशिश बोरकर तलाठी व केशव निकम असे चार सायकल स्वार रात्र d दीवस आळीपाळी ने सायकल चालवत ही रेस पुर्ण करणार आहेत.
हि सायकलिंग स्पर्धा जम्मू काश्मीर येथुन सुरु होऊन कान्यकुमारी येथे सुमारे साडेतीन हजार किलोमीटर चा प्रवास करून समाप्त होणार आहे यात विजयी होणाऱ्या टीम ला अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे यां मराठमोळ्या तरुणांना भरभरून शुभेच्छा..