Breaking News

तरुण महिला पोलिस शिपायाचा मृतदेहच आढळला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-वैनगंगा नदीच्या पुलावरुन एका पोलीस शिपायाने नदीत उडी घेतल्याची घटना घडली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली आहे. मृत्य शिपाई तरुणीचे नाव शारदा नामदेव खोब्रागडे वय वर्ष ३० असे आहे. ती सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील मुळ रहिवासी असून सध्या भामरागड तालुक्यामधिल लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत होती.

शारदा खोब्रागडे यांनी वैनगंगा नदीच्या पुलावर दुचाकी उभी करुन तिथेच मोबाईल फोन ठेवला आणि नंतर नदीत उडी घेतली. धक्कादायक असा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरमोरी येथिल तहसील कार्यालयाचे बचाव पथकाच्या मदतीने वैनगंगा नदीच्या प्रवाहात संध्याकाळपर्यंत शोध घेतला असता कोणताही थांगपत्ता लागला नाही. वैनगंगा नदीच्या पुलावर यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

विशेष म्हणजे वैनगंगा नदीच्या पात्राचे पाण्याची पातळी खालावलेली होती. परंतु गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गेल्या तीन दिवसात पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे शारदा खोब्रागडे नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नाही ना, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्या अविवाहित होत्या असे समजते. त्यांनी या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved