Breaking News

केसलवाडा येथील तथागत विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण

भंडारा:- स्त्री शिक्षणाचे जनक, गरीब व दुर्बलांना न्याय मिळवून देणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी पवनी तालुक्यातील तथागत विद्यालय केसलवाडा येथे साजरी करण्यात आली, ह्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याविषयी आपल्या भाषणातून मुलांना माहिती दिली.अविन दिघोरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून महात्मा फुलेंचे शैक्षणिक कार्य, समाजासाठी केलेली धडपड आणि घडवलेला बदल याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वेदांती गाडेकर, प्रेषिता चव्हाण, खुशी वरखडे यांनी सुंदर भाषण सादर केले याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र आत्राम,मधुकर पुरामकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रदिप गोंडाने यांनी मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved