वर्धा – सुरज गुळघाने
वर्धा/सावली:-जय सेवा स्पोर्टींग क्लब सावली द्वारा आयोजित 58 किलो वजन गटातील सामने मोठ्या उत्साहात पार पडला, त्याप्रसंगी आज वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदासजी तडस यांनी सदिच्छा भेट दिली, त्यानिमित्य आज जय सेवा स्पोर्टींग क्लब च्या मुलांनी खासदार यांना मागणी केली होती की आम्हाला व्यायाम शाळेकरीता साहित्य उपलब्ध करून द्या. त्यामुळे खासदार तडस यांनी जय सेवा स्पोर्टींग क्लब चे अध्यक्ष आणि सदस्याकडे 3 लक्ष रुपयाचे पत्र दिले.
त्याकरिता जय सेवा स्पोर्टींग क्लब चे अध्यक्ष निलेश गेडाम,माजी उपसरपंच भुषण झाडे, माजी उपसरपंच सुधीर वाघमारे, जगदीशभाऊ कलोडे मार्गदर्शक, सुरज मेश्राम,दीपक दहिवलकर, कुणाल उईके, नितीन दाभेकर, स्वप्नील गेडाम, सौरभ मसराम, महेश वाढवे, अक्षय चांभारे,मयुर वाघमारे, अजय वाघमारे, महेश पुरके, विकेश कांबळे,सुरज गुळघाणे,भुषण सिद, पवन गुळघाणे, सचिन बोरकर,प्रवीण चांभारे, महेश गुळघाणे,सुरज मेश्राम, राहुल चांभारे, संकेत खंडाते सुरज वाढवे, सुरज बालपांडे, मेहर आत्राम,वरील सर्व मान्यवर तथा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.