Breaking News

चिमूर तालुक्यात दिंव्याग समता सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-समग्र शिक्षा समवेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर अंतर्गत ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर ला जागतिक समता सप्ताह साजरा करण्यात आला.दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता व शिक्षणात ठीकुन ठेवण्या करीता पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,समाज, शेत्रीय यंत्रणा,व सवंगडी याच्या साह्याने जनजागृती करण्यात आली. गटशिक्षाधिकारी पंचायत समिती चिमूर रुपेश कामडी यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत समग्र शिक्षा समावेशित शिक्षण, गट साधन केंद्र,पंचायत समिती चिमूर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा यांचा संयुक्त विद्यमानाने दिंव्यागाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरखेडा येथे केंद्र प्रमुख विनोद भोयर यांनी लुई ब्रेल व हेलन केलर यांचा फोटोला हार अर्पण करून प्रतिमेचे पुजन व अभिवादन करण्यात आले,शाळेच्या शिक्षकांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थी व उपस्थीत गावकरी यांना समावेशीत शिक्षणाची संकल्पणा व त्यांना मिळणाऱ्या सुविधा बाबत माहिती देण्यात आली.त्यानंतर गावात प्रभातफेरी कडून जन जागृती करण्यात आली.शाळेच्या विद्यार्थ्याच्या चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व विविध खेळ घेण्यात आले, विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमात विनोद भोयर केंद्र प्रमुख जामगाव तथा मुख्याध्यापक, सचिन अण्णाजी लुहुरे समावेशीत शिक्षण तज्ज्ञ,गजानन काळे समावेशीत शिक्षण तज्ज्ञ,नरेंद्र काकडे विशेष शिक्षक, अतकरे,दंडारे,अमृतकर उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved