Breaking News

मिटेवानी येथे 11 डिसेंबर रोजी लेफ्टनंट चषक अकरसिंग पटले यांचा नागरी सत्कार

मिटेवानीचा चषक युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)-तुमसर तालुक्यातील मिटेवानी या ग्रामीण भागातील युवक चषक अकरसिंग पटले हा भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट झाला. उडीसा राज्यातील गोपालपूर येथे त्याला नियुक्ती देण्यात आली.त्याचे मिटेवानी येथे दि.11 डिसेंबर 2023 ला त्याच्या जन्मगावी आगमन होत आहे.लेफ्टनंट चषक ला मिटेवाणी गाव मानाचा मुजरा करणार आहे.त्याच्या आगमना निमित्त स्वागत समारोह कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय मिटेवानी,तंटामुक्ती समिती,महिला पुरुष बचत गट,मराठा सेवा संघ,आलोक आणि समस्त ग्रामवासी मिटेवानी यांनी केले आहे.

या स्वागत समारोह कार्यक्रमाला अतिथी म्हणून लोहीत मतानी I.P.S.पोलीस अधिक्षक,भंडारा, रश्मिता राव I.P.S.पोलीस उपविभागीय अधिकारी,तुमसर,दर्शन निकाळजे उपविभागीय अधिकारी तुमसर,सिद्धार्थ मेश्राम मुख्याधिकारी न प.तुमसर,निलेश ब्राम्हणे पोलीस निरीक्षक तुमसर उपस्थित राहणार आहेत.11डिसेंबर 2023 सायंकाळी 5 वाजता आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved