Breaking News

स्वस्त धान्य दुकानाचा तांदुळ खुल्या बाजारात

*दोन दिवसापासून शेवगाव पोलीस स्टेशन समोर उभा असलेला पोलिसांनी जप्त केलेला तांदळाने भरलेला तो टेम्पो कोणाचा???तहसील कार्यालय आणि पुरवठा अधिकारी फिर्यादी होण्यास का करताय उशीर ¿¿¿*

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव  9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरांमध्ये पैठण रोड येथील सेंट आंद्रिया चर्चच्या जवळ शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करून गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानाचा सरकारी माल खुल्या बाजारात विक्रीसाठी जाताना अनेक क्विंटलमल दोन दिवसांपूर्वी पकडला परंतु पकडलेला तांदूळ हा सरकारीच आहे की नाही याची खात्री करण्यासाठी शेवगाव पोलिसांनी शेवगाव तहसील कार्यालय आणि पुरवठा विभाग यांना एक पत्र दिले परंतु अद्याप पर्यंत हा म** स्वस्त धान्य दुकानाचा आहे की नाही याची खातरजमा न झाल्याने { या टेम्पोचा मालक आणि या धान्याचा मालक यांना वाचवणारा मास्टरमाईंड कोण ??? } हा पकडलेला टेम्पो शेवगाव पोलीस स्टेशन समोर उभा आहे याबाबत अधिक माहिती घेन्यायासाठी शेवगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता त्यांनी तहसील कार्यालय शेवगाव यांना पत्र दिले असून लोकसेवक तथा पुरवठा विभागाची जबाबदार अधिकारी जोपर्यंत तक्रार देत नाहीत आणि मालाची खातर जमा होत नाही तोपर्यंत आम्हाला कारवाई करता येत नाही अशी माहिती मिळाली.

*ताजा कलम*

*शेवगाव शहरासह तालुक्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांसाठी वाटला जाणारा माल गहू आणि तांदूळ विकत घेणारे अनेक नमुने आहेत फुकट मिळणारा हा माल 18 ते 20 रुपये किलो ने घेऊन खुल्या बाजारात 35 रुपयांनी विकला जातो याचे खूप मोठे रॅकेट शहरासह तालुक्यात आहे ते मुळापासून उखडून काढणार कोण ???*

*{ क्रमश }*

*शेवगाव तालुक्यामध्ये तांदूळ कुठेही पिकत नाही परंतु हजारो क्विंटल तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी जाताना पकडला जातो हमाल येतो कुठून याची सखोल चौकशी कोण करणार*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved