जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडार) – दिनांक ७ ते ९ जून २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या ३१ वी मुले व २४ वी मुली सबजुनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या चॅम्पियनशिपचे स्पधेचे भुगाव (अमरावती) येथे आयोजन केले असुन जिल्ह्याची चमु लालबहादूर शास्त्री विद्यालयांच्या पटांगणावर २ जून रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणी मधून संघाचे निवड करण्यात आले आहे.
मुलांच्या संघात कर्णधार- समीर झंझाड, उपकर्णधार- आयुष मानापूरे, मोहीत राखडे, आयुष तितिरमारे, गौरव धूर्वे, भारत निनावे, मानव बुध्दे, संस्कृत केजरकर, तोषित जांगळे, वंश बोपचे, दक्ष सुर्यवंशी, अथर्व कोहळे, प्रशिक्षक शिवशंकर नागपूरे,
व्यवस्थापक यश साखरवाडे, मुलींच्या संघात कर्णधार स्वेता मुळे, उपकर्णधार प्राप्ती धूर्वे, किंजल केसलकर, पूनम कावळे, मिथाली कळंबे, नैना देव्हारे, कस्तुरी सर्गे, नव्या भुरे, सिद्धी क्षिरसागर,अंतरा मानकर, रुणाली साकुरे, अपूर्वा पडोळे प्रशिक्षक म्हणून प्राची चटप, व्यवस्थापक रुपाली कनोजे यांची निवड करण्यात आली आहे.
खेळाडूंनी आपल्या निवडीचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामविकास बहुउद्देशिय शिक्षण संस्था दवडीपार बाजार येथील संस्थापक माजी मुख्याध्यापक राजेश धुर्वे, संस्था सचिव श्याम देशमुख व सर्व शिवछत्रपती अवार्ड प्राप्त खेळाडू, सिनियर आजी- माजी खेळाडू तसेच आपल्या आई- वडीलांना दिले आहे.चमूच्या यशाकरिता अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.