सनफ्लॅग येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ८ हजार विविध प्रजातींचे वृक्षारोपण
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा )- मानवाने स्वतःच्या स्वार्थापोटी बेसुमार वृक्षांची कत्तल केली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टी, अवकाली पाऊस, वाढते तापमान इत्यादी परिणाम दिसून येत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान दोन ते दहा झाडे लावावीत. त्यांच बरोबर संगोपन करावे. म्हणून नागरिकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सदैव तत्पर असावे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले.ते सनफ्लॅग आर्यन कंपनी वरठी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पर्यावरण सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी मियावाकी मिनी फॉरेस्ट तयार करून त्यामध्ये एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. या संकल्पनेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते तांत्रिक संचालक रामचंद्र दळवी, सीईओ दत्तात्रय खोंडे, पतंजलि योग परिवारचे प्रमुख डॉ. रमेश खोब्रागडे, ग्रिनहेरिटेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मो. शहीद शेख, ग्रिनहेरिटेज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मियावाकी मिनी फॉरेस्टचे उद्घाटन करून सर्वांच्या सहभागातून ८ हजार झाडे लावण्यात आली. यावेळी पतंजली योग परिवार, श्री सिद्धेश्वर योग निसर्गोपचार केंद्र, ग्रीन हेरिटेज सामाजिक पर्यावरण संस्था भंडारा यांच्या सहकार्याने घेण्यात आला.
कंपनीचे एच. आर. सतीश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनात सुरक्षा प्रमुख जवाहरलाल गुप्ता यांनी सनफ्लॅग कंपनीचा परिसर हिरवगार करण्यात प्रमुख भूमिका निभावत आहेत. तसेच मियावाकी मिनी फॉरेस्ट तयार करून त्यामध्ये एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमात पतंजलि योग शिक्षक श्याम कुकडे, जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, भारत स्वाभिमान
चे सरचिटणीस यशवंत बिरे, महिला तालुका प्रभारी मंजुषा डवले, सरचिटणीस कल्पना चांदेवार, वनौषधी प्रभारी अनिता खेडीकर, योगशिक्षिका नंदा रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, अतुल वर्मा, राहुल मेश्राम, चंदा मुरकुटे, पतंजली सनफ्लॅग योग वर्गातील सर्व साधक, योग शिक्षिका सुनीता वासनिक, सनफ्लॅग कंपनीचे सर्व विभागातील प्रमुख समीर पटेल, धर्मेंद्र सिंग, विपिन शुक्ला, महेंद्र वाघाये, इरशाद, ब्रह्मानंद मालिक, शेखर मदनकर, जितेंद्र सुतार, वसंत नारायण, सागर उदापुरे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवाहरलाल गुप्ता यांनी केले व प्रास्ताविक सुनील लांजेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुजित भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सनफ्लॅग आर्यन कंपनी वरठी, पतंजलि योग समिती, ग्रीन हेरिटेज सामाजिक संस्था भंडारा येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी ४२ अंश तापमान प्रत्येकांनी झाडे लावून सहकार्य केले.