चिमूर तालुक्यातील अपद्ग्रस्तांना आर्थिक मदत
शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड चिमूर येथील रहिवासी वैशाली संदीप चन्ने हीची आई अर्धांगवायू दुर्धर आजाराने त्रस्त असल्याकारणाने औषधोपचार करीता आर्थीक मदत केली तसेच कोलारा येथील रहिवासी विलास अजाबराव डाहुले यांच्या बैलाच्या पायाची हड्डी मोडली असता औषधोपचार करीता मदत. पळसगाव येथील रहिवासी खुशाल फाये यांच्या मुलाच्या पायाची हड्डी मोडली असता औषधोपचार करीता मदत. गोंडमोहाली येथील रहिवासी पंचफुला देवराव कुंभरे हिला कॅन्सर ग्रस्त असल्याने औषधोपचार करीता आर्थीक मदत दिले. औषधोपचार खर्च अधिक होत असल्याने त्यांनी गावातील भाजपा पदाधिकारी मार्फत चिमूर विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना माहिती दिली असता आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी तात्काळ आर्थिक मदत पोहोचवली.
“शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण”
भांगडिया फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्व. गोटूलाल भांगडिया यांच्या स्मृतिपित्यर्थ नोटबुक वितरण करण्यात आले. खडसंगी, डोमा, किटाडी, हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले. यावेळी भांगडिया फाउंडेशनच्या मेघा भांगडिया, अपर्णा भांगडिया, पार्थ भांगडिया यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.