Breaking News

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असते. या बाबतचा शासकीय नियम असून त्याची राज्यभर अंमलबावणी होत आहे. मात्र चिमूर शहरात अनेक ले आऊट मालक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच प्रकार चिमूर शहरात भूखंडधारकांन सोबत घडला आहे. राचलवार ले आऊट मधे भूखंड खरेदी करून घराचे बांधकाम केलेल्या रहिवाश्यांना या मुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या भूखंडधारकांनी नगर परिषद कार्यालय येथे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

या लेआऊट मधे विद्युत पुरवठा अनियमित असतो शिवाय पथदिवे नाहीत या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ले आऊट मालकाने मूलभूत सुविधा पुरविल्या नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ले आऊट मधे रस्ते नसल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने महिलांना भटकंती करावी लागत आहे.चिमूर शहरात अनेक ले आऊट मधे मूलभूत सुविधेचा अभाव असल्याने मालकाकडून शासकीय नियम धाब्यावर बसवले असून संबधित विभागातील अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमांनी भूखंड विक्रीकरिता परवनिगी दिली अशी चर्चा चिमूर शहरातील चौकाचौकात सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर …

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved