प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव पोलीस स्टेशन ला बिग बुल्स च्या विरोधात गुन्हे नोंदवायला सुरवात झाली असुन या बाबत शेअर’ गुंतवणूक प्रकरणी दोन गुन्हे दाखल पोलिसांकडून तपास सुरू शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.पहिल्या गुन्ह्यात तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गणेश भगवान हनवते (वय ५१, रा. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून कमलेश विजय सिसोदिया, नीलेश विजय सिसोदिया, संदेश विजय सिसोदिया या तीन भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या गुन्ह्यामध्ये २३ लाख ३९ हजार ९८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यशवंत साहेबराव पाटेकर (वय ४२, रा. ढोरजळगाव ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून महेश दत्तात्रय हरवणे (रा. शेवगाव) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्यात भरमसाट परताव्याचे आमिष दाखवून मोठ-मोठ्या रकमा लुबाडण्याचे सत्र शेअर मार्केटच्या माध्यमातून तालुक्यात सुरु असून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार दररोज नव्याने पुढे येऊ लागले आहेत. शहरातील कापड व पादत्राणे व्यावसायिक गणेश भगवान हनवते यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २० लाख रुपयांची रक्कम घेण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांना मुदल व व्याज देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे हनवते यांनी कमलेश, नीलेश व संदेश विजय सिसोदिया या तीन भावाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.ढोरजळगाव येथील यशवंत साहेबराव पाटेकर यांनी देखील शेअर मार्केटमधील भरमसाट नफ्याच्या आमिषाने महेश दत्तात्रय हरवणे यांना तब्बल २३ लाख ३९ हजार ९८० रुपयांची रक्कम दिली. त्यांनी देखील व्याज व मुद्दल देण्यास टाळाटाळ केल्याने पाटेकर यांनी हरवणे याच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भदाणे करीत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केलेला आहे.या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
*ताजा कलम*
*दरम्यान फिर्यादी गणेश हनवते आणि त्यांचा मुलगा हे दोघेही आजारी असून गणेश हनवते हे दिव्यांग आहेत पत्त्यांचा मुलगा हा डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने बेस्ट वर आहे त्यांच्या विरोधामध्ये आरोपींच्या वतीने घरातील महिला पुढे करून खोटी विनयभंगाची तक्रार दाखल करण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला आहे या तिन्ही आरोपी भावंडांनी आतापर्यंत शेकडो लोकांना चुना लावून शेवगाव शहरामध्ये अनेक व्यावसायिक केले आणि त्यात लाखो रुपयांना लोकांना गंडा घातला आतापर्यंत लोकांना धमक्या देऊन आपली देणे बुडवण्याचे काम केले याची सखोल चौकशी शेवगाव च्या पोलिसांनी करावी अशी विनंती हनवते कुटुंबाने अहमदनगरचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांच्याकडे केले आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*