जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या प्रयत्नानी गदगाव व मिनझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती निर्माण झाल्या मुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा घेता येईल. गदगाव व मिनझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांचे हस्ते झाले असून भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु भाऊ देवतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिनांक १४ जुलै ला गदगाव व मिनझरी येथील लोकार्पण प्रसंगी सरपंच जगदीश नन्नावरे,भाजप जेष्ठ नेते अर्जुन पाटील थुटे, माजी जिप सदस्य विलास डांगे, युवा मोर्चा तालुका महामंत्री रोशन बनसोड, प्रशांत डवले, मनी रॉय, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहनीश गिरी, डॉ.श्रीकांत रणदिवे, डॉ कांचन धारणे आदी उपस्थित होते.