Breaking News

चिमूर तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आज दिनांक १५/०७/२०२४ ला तहसील कार्यालय येथे महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आजपासून सुरू‌, या संपामुळे चिमूर तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावत झालेले आहे. या आंदोलनात चिमूर तालुक्यातील नायब तहसीलदारांसह महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत शासन महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

महाराष्ट्र महसूल अहर्ता परीक्षा नियमातील तरतुदीनुसार सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात यावी, महसूल विभागातीलच नियुक्त लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीची अधिकार प्रदान करण्यात यावे, अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी, अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे शासनापुढे ठेवण्यात आल्या आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या या मागण्या शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासन या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेकडून केला आहे. संघटने कडून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला, मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रथम लाक्षणिक संप व आता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved