जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर येथील नागरिकांनी पकडला असून ट्रॅक्टर मालकावर महसूल विभागाने कार्यवाही करून ट्रॅक्टर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले.
दिनांक 18/09/2024 रोजी मौजा सिरपूर येथे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय सिरपुर येथे नागरिकांनी 1 ब्रास रेती भरलेला ट्रॅक्टर थांबवून ठेवला होता. तहसिलदार चिमूर यांचे आदेशानुसार रेती भरलेले भरलेला ट्रैक्टर क्रमांक MH-34-CJ0118 व ट्रॉली क्रमांक MH-34-CT 1541 राकेश दशरथ भोयर वडाळा पैकु चिमूर यांचा असून शिरपूर साझा येथील तलाठी केतनसिंग घरकेले, यांनी सदर ट्रॅक्टर मालकावर कार्यवाही करून अवैध रेती ट्रॅक्टर चिमूर येथे तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.