जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले असून तळोधी नाईक येथे ३० लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम झालेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तळोधी नाईक येथे विविध ठिकाणी आमदार बंटी भांगडिया यांचे औक्षण करण्यात आले. मासळ जिल्हा परिषद क्षेत्र बारमाही सिंचनाखाली येणार असून चिमूर विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांना या सिंचनाचा फायदा होणार – आमदार बंटी भांगडीया.
पळसगाव या ठिकाणी उभारण्यात आलेल्या संविधान सभागृहाचा लोकार्पण सोहळा तथा खनिज विकास निधीअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नवीन सभागृहाचे भूमिपूजन असा संयुक्त दुहेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. बंटी भांगडिया यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच सरिता गुरनुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.स्थानिक आमदार निधीअंतर्गत हे सभागृह उभारण्यात आले. त्याचप्रमाणे बाजूलाच नवीन खनिज विकास निधीअंतर्गत 40 लाखांचे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सुद्धा यावेळी करण्यात आले.
नेरी-सिरपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सिरपूर, गोरवठ, लोहारा, नवतळा येथील नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या सभागृहाचे लोकार्पण तथा नवीन सभागृहाचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 16 सप्टेंबर ला संपन्न झाले सदर विकास कामे ही जनसुविधा, आमदार निधी तसेच 2515 च्या खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आले असून मोठया उत्साहात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.