Breaking News

टाकळी वाढोनाबाजार येथे सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प ( BCI) अंतर्गत बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ :- यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या टाकळी वाढोणा बाजार येथेआज दि. 23/12/2024रोजी सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प BCI अंतर्गत बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षण विषय उद्योजकता विकास, डिजिटल आणि आर्थिक साक्षरता व नेतृत्व विकास प्रशिक्षण यामध्ये डिजिटल पेमेंट, बचत गटातील व्यवहाराबद्दल पारदर्शकता, वित्तीय समावेशन, नेट बँकिंग, डिजिटल व्यवसाय मार्गदर्शन, डिजिटल आर्थिक व्यवहार,सामूहिक व्यवसाय, विणकाम, ब्युटीपार्लर प्रशिक्षण, PMEGP योजनाची माहिती,DIC मार्फत प्रकल्प अहवाल,कोटेशन प्रक्रिया,बचत गटाला मिळणारे अनुदान व कर्जावरील व्याजदर माहिती वयक्तिक व्यवसाय करिता मुद्र लोण माहिती शिशु गट,किशोर गट व तरूण गट निहाय मुद्रा लोण कर्जपुरवठा बाबत माहिती दिली.प्रथम फाउंडेशन तर्फे चालणारे युवक व युवती करिता चे व्यवसाय प्रशिक्षण व प्रवेश प्रक्रिया माहिती उद्योग मॉडेल ,बेसिक नॉलेज मार्केटिंग व्यवसाय निवड बाबत तसेच संभाव्य रिस्क माहिती दिली.

वरील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष :- शेरअली बापू लालानी उधोजक तथा सामाजिक कार्यकर्ते व जेंडर कमिटीचे सदस्य वाढोनाबाजार,प्रमुख मार्गदर्शक प्रफुल्ल तु. पांगुळ,सेंट्रल बँक अधिकारी वाढोनाबाजार वैभव पंडित,ऍडोकेट तथा सामाजिक कार्यकर्ते राळेगाव जयानंद टेभेकर,प्रथम फाउंडेशन समनवयक राळेगाव
गणेश बोरकर प्रथम फाउंडेशन राळेगाव  ऍडओकेट वैशाली मोंढे मॅडम राळेगाव व जेंडर कमिटी सदस्य सचिन मातले afpro प्रकल्प व्यवस्थपक यवतमाळ नंदकिशोर डेहनकर Pu-05 मॅनेजर राळेगाव
मयूर वटाणे सामाजिक कार्यकर्ते राळेगाव या प्रशिक्षणाला pu-05 च्या कार्यक्षेत्रातील वाढोनाबाजार, टाकळी, पिंपळगाव, आठमुर्डी, पोड,भुलगड, सुभानहेटी वरध, अंतरगाव, कोपरी, भांब, आपटी, शेळी, चिखली वनोजा, या 15 गावातील बचतगट अध्यक्ष, सचिव,सदस्य, कृषि सखी, पशु सखी, पेसा समिती अध्यक्ष, प्रथम फाऊंडेशन चे प्रतिनिधी सरपंच, सदस्य व जेंडर कमिटीचे सदस्य, लीड फार्मर प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते, Pu-05 राळेगाव चे सर्व कृषिमित्र उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

तथागत बुद्ध हे गणराज्य लोकशाही चे प्रणेता

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- रमाई बौद्ध महिला …

अंगाची हळद उतरण्याआधीच भारतीय जवान झाला सिमेवर सज्ज

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar ” सुखदुःखाचे अश्रू डोळ्यात घेऊन गावकऱ्यांनी जवानास दिला निरोप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved