जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा,विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेचे आयोजन करीत असते.सत्र २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील जिल्हा परिषद चंद्रपूर आयोजित चिमूर तालुकास्तरीय नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,जांभूळघाट येथे संपन्न झाल्या.या स्पर्धा अंतर्गत बुद्धीमापन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पारडपारचा विद्यार्थी मधूर हरी मेश्राम हा चिमूर तालुक्यातून पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे.या स्पर्धात तालुक्यातील १४ केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
चिमूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांचे हस्ते मधूर मेश्राम याला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विशाल बोधाने, स्वप्नील खांडेकर,टी. आर.महल्ले,केंद्रप्रमुख विनायक औतकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन साधन व्यक्ती वर्षा वरभे यांनी केले. प्रास्ताविक संजय पंधरे यांनी केले.आभार अरविंद आत्राम यांनी मानले.मधूरच्या यशाबद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.