विशेष प्रतिनिधी – पारनेर
पारनेर :- पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांच्या स्थापना करून २६ जानेवारी पर्यंत अहवाल कार्यालयाकडे सादर करावा – दयानंद पवार गटविकास अधिकार पारनेर तालुका हा क्रांतिकारक सेनापती बापटांचा,जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांचा तालुका असुन याच तालुक्यातून राज्याला दिशादर्शक मोठी राज्यव्यापी चळवळ उभी झाली असुन महारष्ट्रात शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर राज्यात मोठे काम उभे झाले आहे. राज्यातील अनेक तालुक्यांसह, जिल्ह्यांमध्ये मोठमोठी यशस्वी आंदोलने होत असताना गावोगावचे शेतकरी आंदोलनात सक्रीय होत असून गावागावातील अनेक शेतरस्ते चळवळीच्या माध्यमातून खुले होताना दिसत आहेत.
या ऐतिहासिक चळवळीला छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाच्या निकालाने बळकटी दिली असून अर्ज केल्यानंतर तहसिलदारांनी ६० दिवसांत शेतरस्ता खुला करून हद्द निश्चित करून देण्याचे आदेश दिले असून अनेक वर्षांचा प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष यामाध्यमातून सुटणार आहे.दि.३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वात पारनेर शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यानंतर चळवळीच्या माध्यमातुन पारनेरचे गटविकास अधिकारी दयानंद पवार यांना शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे स्मरणपत्र देताच बीडीओंनी पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना २६ जानेवारी पर्यंत ग्रामशेतरस्ते खुले करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती गठीत करून समितीचा अहवाल सादर करण्याचा तातडीचा आदेश काढत शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातुन त्यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी पारनेर तालुका शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे सचिन शेळके, भाऊसाहेब वाळुंज, दसरत वाळुंज, संजय साबळे, बबन गुंड, हनुमंत शेटे, सुभाष शेळके, बाबाजी घोगरे, बापूसाहेब जंगले, पंढरीनाथ काळखे, स्वप्निल गट, लक्ष्मण वाढवणे, रघुनाथ वाढवणे, मयूर वाढवणे, किसन जंजाड, अविनाश वाढवणे, मारुती वाळुंज, बाबा पठाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट ओळ- अशी असेल ग्रामस्तरीय समिती !
सरपंच अध्यक्ष, मंडळ अधिकारी महसूल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, चेअरमन विकास सेवा सोसायटी, प्रगतशील शेतकरी, एक महिला ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक, बीट जमादार, पोलीस पाटील, तलाठी आदी सदस्य राहतील.
चौकट ओळ- महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा चाललेला संघर्ष संपवण्यासाठी ब्रिटीशकालीन शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर जनजागृती अभियान,जन आंदोलन,न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधत राज्यात सुरू झालेल्या चळवळीला मोठे यश प्राप्त होत असून तालुका,जिल्हा प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात येत आहे तरी राज्यातील ज्या ग्रामपंचायती गावातील सर्व शिवपानंद शेतरस्ते खुले करतील अशा ग्रामपंचायतींचा महाराष्ट्र शिव पानंद शेतरस्ता चळवळ विशेष पुरस्कार देत सन्मान करेल – शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ.