अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर हकीगत अशी की फिर्यादी वय-44 वर्षे रा. दत्त मंदौर जवळ वरुर रोड शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून दिनांक-04/01/2025 रोजी यांच्या दाखल फिर्यादीवरून शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 10/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137 (2), 74, 87, 351(3), 3(5) सह बालकांचे लैंगिक अपराधापासुन प्रतिबंध व संरक्षण अधिनियम 2012 चे 8.12 प्रमाणे दिनांक 04/01/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील फिर्यादी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे येवुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे 1) अजिंक्य संजय खैरे रा. शेवगाव ता. शेवगाव याने माझ्या मुलीला (वय-17) वर्षे हिला लग्नाचे आमिष दाखवुन आरोपी नामे 2) रुषीकेश दत्तात्रय थावरे रा. शेवगाव ता. शेवगाव याने मोटार सायकल देवुन माझ्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन फुस लावुन पळवुन घेवुन जावुन तिला जबरदस्तीने तिच्याशी लग्न करण्यासाठी तसेच तिचा हात पकडून तिस जवळ ओढुन तिच्या सोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला तसेच रुषीकेश थावरे याचे मदतीने अजिंक्य संजय खैरे याने तिचे अपहरन करुन घेवुन गेला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध मा. पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी योग्य वेळी वेगवेगळी दोन पोलीस पथके तयार करून पाथर्डी हद्दीत तसेच दुसरे पथक शिरुर जिल्हा बीड हद्दीत रवाना करण्यात आले होते.
सदर मुलीचा तसेच आरोपीचा शोध घेत असतांना तांत्रिक तपासाच्या सहाय्याने तपास पथकाला माहीती मिळाली की पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी रोडने पाथर्डी येथील धायतडकवाडी गावाचे शिवारात असलेबाबत माहीती मिळाल्याने पिडीत मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेवुन आरोपीस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अजिंक्य संजय खैरे रा. माळीगली ता. शेवगाव 2) ऋषिकेश दत्तात्रय थावरे रा. माळीगल्ली ता. शेवगाव असल्याचे सांगितल्याने सदर आरोपीस व पिडीत मुलीस ताब्यात घेवुन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन दोन्ही आरोपीस सदर गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्र. MH-16 -OQ – 2197 ही जप्त करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला अहिल्यानगर,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर,उप-विभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, पोसई प्रविण महाले, पोहेकों चंद्रकांत कुसारे, पोहेकों आकाश चव्हाण, पौकों शाम गुंजाळ, पोकों संतोष वाघ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों प्रशांत आंधळे, पोकों राहुल खेडकर, पोका संपत खेडकर, पोकों राहुल आठरे, पोकों एकनाथ गरकळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पौकों राहुल गुंडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोसई प्रविण महाले हे करत आहेत.
*ताजा कलम*
एका सरकारी खात्यात नोकरीला असलेल्या नोकरदाराने शहरातील प्रमुख राज्य महामार्गावर काही वर्षांपूर्वी मोठ्या थाटात एक हॉटेल सुरु केले तेथे बेकायदेशीर “रम, रमा, रमी” जोरात सुरु असल्याची खमंग चर्चा सुरु असल्याच्या सुरस कथा चर्चिल्या जात होत्या शहरातील त्या टॉप च्या हाटेल मध्ये परराज्यातील गुंडाना हाताशी धरून आतापर्यंत एक डझन वेळा भांडण मारामाऱ्या धप्पाकुट्टी झाली आहे पण “चोरीचा मामला हळूहळू बोंबला” भांडणात हॉटेल चे लाखो रुपयांचे नुकसान झाले हात पाय तुटले तरी शक्यतो प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत कधी गेलच नाही त्या सरकारी कर्मचाऱ्याला नेमका आशीर्वाद कोणाचा ??? माझी बातमी करशील तर तोडूनच टाकील पत्रकाराला मग्रुरीची भाषा कोणाच्या जीवावर !!! आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही !!! तुम्हला “काय उखडायचे उखडा” हॉटेल चालकाचा हा माज नेमका कोणाच्या जीवावर ??? शेवगांव शहराला कुठं घेऊन चाललय हे गढूळ वातावरण हे शेवगांवचे कर्तव्य दक्ष पोलीस नक्की शोधून काढतील.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता /पत्रकार*