jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” चोरीस गेलेला १,५०,०००/- रु. ची मालमत्ता जप्त “
” स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोस्टे सिंदेवाही ची संयुक्त कारवाई “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे दाखल अपराध क्रमांक १७८/२०२५ कलम ३०५ (१) ३३१ (४) भारतीय न्याय संहिता या गुन्हयातील आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक आणि पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील पथक यांनी संयुक्तरित्या करुन आरोपी नामे शुभम नागोसे वय २८ वर्ष रा. सिंदेवाही व इतर ४ यांना पो.स्टे. सिंदेवाही परिसरातून ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन नागपूर व सिंदेवाही येथील गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेले वाहने जप्त करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोस्टे सिंदेवाही चे ठाणेदार पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचे संयुक्त नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सागर महल्ले, पोउपनि प्रेमनाथ ठवकर, पोहवा जयंत चुनारकर, नितेश महात्मे, पो. अं. गणेश भोयर, प्रदीप मडावी व चालक पोहवा दिनेश अराडे यांनी केली आहे.