नागपूर दि. 28 : 2022 मध्ये होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकासाठी वापरावयाच्या मतदार यादीचे काम सध्या भारत निवडणूक आयोगाकडून सूरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप यादी जाहीर होणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षाच्या होणाऱ्या तरूण-तरूणींनी फॉर्म नं. 6 भरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे.
फॉर्म नं.6 निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एनव्हीएसपीडॉट.इन यावरून डाऊनलोड करता येईल.तसेच बीएलओ यांच्याकडे,जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय,सर्व पोलीस स्टेशन्स,सर्व तहसील कार्यालय,झोनल ऑफीस येथे अर्ज उपलब्ध आहेत.तरी नवमतदारांनी याची नोंद घेण्याचे ,आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.