Breaking News

जिल्हा परिषद निवडणूक होणाऱ्या ठिकाणी स्थानिक सुटी जाहीर

नागपूर दि. 28 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील रिक्त पदाच्या पोट निवडणूक 5 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण व हिंगणा या तालुक्यात असून त्याच ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित निवडणूक असलेल्या गटाच्या निर्वाचन गणाच्या क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात नरखेडमध्ये 2 गटासाठी (जि.प. मतदार संघ) 12, काटोल 2 गटासाठी 8, सावनेर 2 गटासाठी 5, पारशिवनी 1 गटासाठी 4, रामटेक 1 गटासाठी 9, मौदा 1 गटासाठी 7, कामठी 2 गटासाठी 9, नागपूर ग्रामीण 1 गटासाठी 3, हिंगणा 3 गटासाठी 16, कुही 1 गटासाठी 6 असे एकूण 16 जिल्हा परिषद मतदार संघात 79 उमेदवार रिंगणात आहेत. तर 31 पंचायत समिती गणात 125 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved