Breaking News

गोरगरीब नागरीकांना घरकुल मिळणार तरी केव्हा?

.चिमूर नप च्या मंजूर घरकुले धूळ खात, नप चे दुर्लक्ष.

.कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पू शेख यांचा आरोप.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर नगर परिषद च्या पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ६९५ घरकुले मंजूर झाली असताना मात्र अजून पर्यत सुद्धा घरकुल बांधकामे कार्यान्वित न झाल्याने लाभार्थी मध्ये नाराजी व्यक्त होत असल्याने मंजूर घरकुल धूळखात पडल्याचे सांगत नप प्रशासन चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चिमूर शहर कांग्रेस मीडिया प्रमुख पप्पू शेख यांनी केला.

 

चिमूर नगर परिषद अंतर्गत क्षेत्रातील गोरगरीब नागरिकांनी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी प्रस्ताव नगर परिषदला सादर केला होता. त्यात त्यांचे वेळ आणि आर्थिक खर्च झालेला होता. अनेक लाभार्थ्यांनी आपापले प्रस्ताव सादर केले असता त्यात ६९५ लाभार्थ्यांचे घरकुले मंजूर झाले.

मंजूर प्राप्त घरकुले बांधकाम कार्यान्वित करण्यासाठी लाभार्थी टक लावून पाहत असून नगर परिषदकडे जाऊन चकरा मारीत आहेत.परंतु उडवाउडवीची उत्तरे देत असून लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र शासन व राज्य शासन कडून मंजूर झाले असताना मात्र केंद्र सरकार निधी देत नसल्याचा आरोप करीत नगर परिषद पाठपुरावा करीत नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ६९५ घरकुले मंजूर प्रस्ताव कोठे धुळखात पडले हा प्रश्न निर्माण होत असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कांग्रेस चिमूर शहर मीडिया प्रमुख पप्पू शेख यांनी केला असून मंजूर घरकुल बांधकामे करण्याची मागणी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved