Breaking News

वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण कायम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :-आठवडा होऊनही वाघाची दहशत कायम असून वाघाच्या भीतीने परीसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. कोठारी वनपरिक्षेत्रामधील बेर्डी शेतशिवारात आपल्या स्वतःच्या शेतात कापुस वेचणीसाठी आणि शेतातील काम करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यावर शेतामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव केशव भिवाजी रामटेके वय ६० वर्षे असे असून तो पोंभूर्णा तालुक्यातील खरमत येथील रहिवासी आहे.

सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे. कापूस वेचणी व धान चुरण्याचे काम जोमाने सुरू आहे. आज दुपारी केशव रामटेके आपल्या शेतात शेतीचे काम करीत होता. शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून रामटेके यांना जखमी केले.बाजूला त्याचा मुलगा व शेतमजूर असल्याने त्यांनी आरडाओरडा केला त्यामुळे तो थोडक्यात बचावला. लगेच त्याला वैद्यकीय उपचारासाठी पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद …

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved