जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख प्रहार सेवक यांची पूर्व विदर्भ प्रमूख तथा चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख रुग्ण मित्र गजूभाऊ कूबडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा प्रहार मय होत आहे,
गाव तिथे शाखा ,शाखा तिथे प्रहार सेवक या जिल्हात मोठ्या प्रमाणात वाढत प्रहार जनशक्ती पक्ष वाढत आहे या काही दिवसांत वंदनीय नामदार राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या विचारातून व रुग्णमित्र गजूभाऊ कूबडे याच्या प्रयनेतून चंद्रपूर जिल्हा प्रहार मय होईल अशी ग्वाही सर्व प्रहार सेवक यांनी दिली, बैठकीचे मुख कारण जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख प्रहार सेवक यांचा कामांचा आढावा घेण्यात आला.
त्यात प्रमूख प्रहार सेवक यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील आपल्या कामाचा आढावा रुग्ण मित्र गजूभाऊ कूबडे यांच्या कडे सोपविण्यात आला. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे हि बैठक संपन्न झाली.