
भिसी बसस्थानक जागेची केली पाहणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- भिसी बसस्थानक च्या बांधकामास सुरवात होत प्रथम अतिक्रमण काढून घेतल्यावर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जागेची पाहणी करीत एसडीई सोनवाल यांचे शी प्रस्तावित बांधकाम नकाशा वरून चर्चा केली. बसस्थानक बांधकाम जागेची पाहणी करीत असताना ज्यांची दुकाने काढण्यात आली त्यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी येत्या रविवारी सविस्तर चर्चा करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, माजी सभापती सतीश जाधव भाजप तालुका उपाध्यक्ष मनीष तूंम्पलीवार, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भिसी जीप क्षेत्र प्रमुख निलेश गभने, आकाश ढबाले, दामू कामडी, राजू बानकर, लीलाधर बनसोड तर अभियंता उपगलनवार आदी उपस्थित होते.