
जगात पुन्हा एकदा जुन्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशासह राज्यातील सर्व यंत्रणांनी कंबर कसली आहे.
परंतु पुष्कळ काळजी घेऊनही भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 66 वर्षीय आणि 46 वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.
गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता.त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे.
तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढे आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती.मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव वेगाने होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही बाब लक्षात घेत विदेशातून आणि त्यातही ओमिक्रॉनसाठी हाय रिस्क म्हणून जाहीर करण्यात आलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ही खबरदारी घेतली जात असतानाही भारतात ओमिक्रॉनने शिरकाव केला असल्याने चिंता वाढवली आहे.