जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील अमरपुरी-भांसुली येथे मागील 34 वर्षापासून दत्त जयंती मोठ्या उत्साहाने थाटामाटाट साजरा करण्यात येतो. आजही दरवर्षी प्रमाणे अमरपुरी- भांसुली गावात दत्त जयंती महोत्सव आयोजन करण्यात आले होते. व जयंती दोन दिवसीय महोत्सवाच्या प्रसंगी दि, १८डिसेंबरला १९ विधिवत उपस्थित समाज बांधव व ह. ब. प. पूज्य उत्तमदासजी राणे महाराज मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
रात्रीला जागृतपर ची वारकरी भजन मंडळी यांनी भजने सादर केली व दिनांक १९ डिसेंबर ला सकाळला श्री दत्त यांची भव्य प्रतिमेची समाज बांधवांनी भव्य अशा ‘डोल ताशांच्या गजरात गावातून सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भव्य मिरवणूक काढण्यात आली, नंतर श्री. समर्थ सद्गुरू माऊली उत्तमदासजी महाराज भद्रावती यांचे ब्राम्हवानी यांचे गोपालकाल्याचे कीर्तन दुपारी १२ पासून ते ४ वाजेपर्यंत संपन्न झाला, सायंकाळी ५ वाजता पासून महाप्रसादाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्याच बरोबर ग्राम स्वछतेवर पुंडलिक राणे लालाजी शेंडे महाराज मान्यवरांच्या उपस्तीत सकाळी ७ वाजता कार्यक्रम घेण्यात आला मान्यवर मंडळींनी प्रबोधनातून सांगितले. कार्यक्रमास समाज बांधव सहकार्यस नंदू जांभुळे क्रिश धोंगडे महेश मसराम अरविंद राणे फुलचंद राणे विशाल ढोक प्रणय रामटेक निखिल झाडे व गावकरी शेकडो संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंकर राणे यांनी केले.