Breaking News

मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील गाईड्स जाणार बेमुदत संपावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-अभयारण्यात आपली कर्तव्य व जबाबदारी समजून वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून वनविभागाचे प्रतिनिधी गाईड ( मार्गदर्शक) हे वनाचे संरक्षण व संवर्धन जवाबदारी समजून प्रामाणिक पणे कार्य करत असतात तरीसुद्धा वनविभाग यांच्या मागण्याकडे हेतुपुरस्कर लक्ष देत नाही तरी या संदर्भात वारंवार अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघाचे शिष्टमंडळ समक्ष व पत्राद्वारे मागण्या वनविभागाच्या लक्षात आणून सुद्धा वनविभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही,

­

 

त्यामुळे आज अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश दिनांक 19 / 1/ 2022 पासून संपावर जाण्याची नोटीस साहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर चे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक रामगावकर साहेब यांना दिनांक घेण्यात आलेला आहे 27 12 2021 देण्यात आली आहे तरी येणार्‍या वेडात मागण्या पूर्ण न झाल्यास पूर्ण महाराष्ट्रातील गाईड्स हे संपावर जाण्याचा निर्णय अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी घेतलेला आहे,

व संप बेमुदत राहील संपाच्या कालावधीत जर कुठलीही औद्योगिक शांती बिघडली जर कुठल्याही प्रकारची हानी झाली तर त्यास गैरअर्जदार जिम्मेदार राहील असे 27/12/2021 पत्रामध्ये कळविण्यात आलेला आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या …

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved