Breaking News

नागपूरच्या 20 वर्षीय तरुणांचे चंद्रपुरात आगमन

देशाटन करणाऱ्या रोहन चे महानगर भाजपाने केले स्वागत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-प्लास्टिक बाबत जागृती निर्माण करणे,विविधतेत एकता प्रस्थापित करणे,संस्कृती-सभ्यता समजून घेण्यासाठी पायी देशाटन करणाऱ्या कामठी(नागपूर) येथील उत्साही 20 वर्षीय तरुणाचे रविवार(9जानेवारी)ला चंद्रपुरात आगमन झाले.या महत्वाकांक्षी तरुणाचे भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे,आ सुधीर मुनगंटीवार जनसम्पर्क कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,भाजपा नेते रवी आसवानी,देवानंद वाढई,मनोज सिंघवी,सूरज पेदुलवार, भारती दुधानी,संदीप देशपांडे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी रोहन अग्रवाल यांचा महापौर कंचर्लावार व जिल्हाध्यक्ष डॉ गुलवाडे यांचे हस्ते स्मृती चिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.रोहनने या वेळी,माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सिंहावलोकन विकास पुस्तिकेचे अवलोकन केले.

या प्रसंगी डॉ गुलवाडे यांनी,रोहनच्या संकल्पाचे कौतुक करीत,पुढील प्रवासात काही अडचणी आल्या तर,भाजपा सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.तर,रोहन अग्रवाल यांनी,चंद्रपूरकरांना ऐतिहासिक वारसा जपत,संस्कृतीचे रक्षण करा,विविधतेमध्ये एकता हे व्यवहारात आणा,असे आवाहन केले.प्रकाश धारणे यांनी यावेळी आ.मुनगंटीवार यांच्या उल्लेखनीय विकासकामांची सखोल माहीती करून दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कार्यालयाची गुंतवणूकदारांनी केली दाना दान “घोटण परिसरातील विग्ने यनामक एक भामटाही फरार” ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 60051 755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाडजळगाव येथील …

जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved