
हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न-पतीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
गोंडपिपरी-कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधित घटली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पतिने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला नंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले.घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी राजू बावणे वय अंदाजे (42) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारासाठी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतक योगिता राजू बावणे वय(35) यांचे प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठवले असून ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.अद्यापही हत्येचे कारण कडले नाही.पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात सुरू आहे.