जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
चहांद ;- आज दि.१८/०९/२०२४ सोनामाता हायस्कूल चहांद येथे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सखी सावित्री समिती, शाळा सुरक्षा समिती व परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. या समित्यांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभाग यवतमाळ जिल्हा परिषद च्या उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) गावंडे मॅडम, विस्तार अधिकारी (माध्यमिक) धावडे मॅडम, शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार मॅडम यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी सदर अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. शालेय सुरक्षा बाबतचा आढावा घेतला. तसेच सुरक्षा समिती, सखी सावित्री समितीच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सदर भेटीवेळी अधिकाऱ्यांनी शाळेतील परिसर व परस बागेची पाहणी केली.
शाळेचा स्वच्छ सुंदर परिसर व सुसज्ज अशी परसबाग पाहून अधिकाऱ्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे कौतुक केले. यावेळी राळेगाव पंचायत समितीचे साधन व्यक्ती प्रशांत चांदोरे व जिल्हा परिषद शिक्षक ओंकार सर हे उपस्थित होते. या भेटी वेळी शालेय कामकाज तसेच परिसर याबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.