Breaking News

चिमूर नगर परिषदेवर धडकल्या हजारो महिला-नगर परिषद समोर फोडल्या घागरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध मागण्यासाठी डॉ.सतिश वांरजूकर यांच्या नेतृत्वात हजारो महिलानी नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन नगर परिषद समोर घागरी फोडून संताप व्यक्त केला.चिमूर विधानसभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांचे नेतृत्वात नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध मांगन्यासाठी हजारो महिलांचा घाघर मोर्चा व सुशिक्षित बेरोजगारांचां निषेध मोर्चाचे आयोजन चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.

काँग्रेस कार्यालय पासून मोर्चाला सुरुवात झाली. चिमूर शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमन करत मोर्चा नगर परिषद कार्यालयवर धडकला. मोर्चा चे निवेदन स्विकरण्या करीता मुख्याधिकारी सुप्रिया राठोड उपस्थित नसल्याने मोर्चेकऱ्यांचा राग अनावर झाल्याने सर्व महिलांनी घागरी नगर परिषद समोर फोडल्या. व डॉ.सतिश वारजूकर कार्यालय समोर ठीया मांडून बसले. मोर्चाला हिंसक वळण येईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी मध्यस्थी करत हिंसक आंदोलन शांत केल्याने होणारा अनर्थ टळला, डॉ.सतिश वारजूकर यांनी निवेदन आम्ही वरिष्ठ अधिकारी यानाच देऊ या भूमिकेवर ठाम राहिले.

तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी तातडीने नगर परिषद कार्यालयला भेट दिली, मोर्चाचे रूपांतर सभेमधे झाले. यावेळी मोर्चाला खासदार नामदेव किरसान, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार अविनाश वारजूकर. विधानसभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर, गजानन बुटके, नम्रता खेमस्कर,प्रज्ञा राजूरवांडे यांनी मार्गदर्शन केले. मोरच्याची आक्रमकता लक्ष्यात घेता पोलिस निरीक्षक संतोष बाकल जमावाला शांत ठेवण्यासाठी सर्व परिस्थिती वर लक्ष ठेऊन होते. मोर्चाला हजारो महिला व बेरोजगार युवक सहभागी झाले होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved