Breaking News

वनविभागाची मोठी कारवाई सांबराची शिकार प्रकरणी ११ जणांना घेतले ताब्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-आज दिनांक.१७/०१/२०२२ रोज सोमवार ला १०:३० वाजताच्या सुमारास शंकरपूर पासून जवळच असलेल्या पिंपळगाव व नवतळा येथे जंगल लागून असून या जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्याच्या साह्याने सांबराची शिकार केलेली आहे.

 

हे मास गावात आणून विक्री करण्याचा बेत होता याबाबतची गोपनीय माहिती वनविभागाला मिळताच त्या माहितीनुसार नवतळा येथील शंकर मसराम यांच्या घरी धाड मारली असता सांबराची भाजी शिजत होती ती भाजी जप्त करून त्याला बोलते केले असता शिकार करणारे मुख्य आरोपी हे पिंपळगाव येथील असल्याने त्यांच्या घरी धाड मारली त्या धाळीत तीन किलो शिजविले मास, तीन किलो कचे मास, चामडे,डोके,पाय, सत्तुर, कुराड, विळा, आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.


या कारवाईत पिंपळगाव येथील अरविंद तुकाराम ननावरे, निखिल महादेव जीवतोडे, अवचित सुभाष बारेकर,राजू घुघुसकर ,रुपेश धारणे ,एकनाथ बारेकर ,सुरज हरी घरत , अभिषेक चंद्रभान नन्नावरे, तर नवतळा गावातील शंकर मसराम, राजू वाढई ,रामू राजेराम कुमरे यांना ताब्यात घेतले असून वन विभागाची कारवाईची सुरू आहे.

 

वृत्त लिहेपर्यंत ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र अधिकारी यु.बी.लोखंडे, वनरक्षक नैताम, वनरक्षक सोनुले प्रदीप ढोणे व आदी तपास करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved