
निरुपयोगी द्रवनत्र पात्र खरेदीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर दि. 19 जानेवारी : जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव गुरुवार, दि. 27 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. निरुपयोगी द्रवनत्र पात्रांची घसारा किंमत 1,84,196 एवढी असून सदर निरुपयोगी द्रवनत्र पात्र खरेदीसाठी इच्छुकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, नगीनाबाग, चोरखिडकी, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे यांनी कळविले आहे.