
लहान मुली चा खाऊ चे पैसे, जुते चपल सह ईतर सामान लंपास
प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
दवलामेटी(प्र):- वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुरषोत्तम नगर दवलामेटी येथे राहणारे योगेश आकरे रविवार ला सह कुटुंब बाहेरगावी पारिवारिक समारंभात गेले असल्याने संधी साधून चोरट्यांनी सब्बल चा सहायाने घर फोडून मौल्यवान वस्तू सह लहान मुलीचा खाऊ चे पैसे , चप्पल जूते, तीन गुंड, चांदीची पायपटी सह घरातील ईतर वास्तू लंपास केल्या.
सविस्तर वृत्त असे की, रविवारला सकाळीं योगेश आकारे सह कुटुंब पारिवारिक समारंभात तुमसरला गेले होते. योगेश आकरें नी सांगितल्या प्रमाणे त्यांचा मित्र मधूकर शेंडे लाईट सुरु करण्या साठी व कोंबड्यांना दाना पानी करण्यासाठीं सायंकाळी पाच वाजता योगेश आकरे यांचा घरी गेले असता सदर घटना त्यांचा लक्षात आली. मित्राने त्वरीत आकरेला फोन वर सदर माहिती दिली.
योगेश आकरे नी वाडी पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली असता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व पुढील तपासास सुरवात केली.