
संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- संजयगांधी निराधार योजनेच्या प्रकरणांना मंजूरी देण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्पकाळ योजना, संजय गांधी विधवा योजना व अपंग योजनच्या 597 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली, चिमूर तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक समितीचे अध्यक्ष संजय डोंगरे यांचे अध्यक्षते खाली तहसीलदार प्राजक्ता बुरांडे व नायब तहसीलदार तुलसीदास कोवे यांचे प्रमुख उपस्थित नुकतीच संपन्न झाली, या बैठकीत सर्व प्रकारच्या अरजाची तपासणी करण्यात आली,
आवश्यकत्या कागदाची पूर्तता करणाऱ्या श्रावण बाळ योजने अंतर्गत 271 इंदिरा गांधी उर्धपकाल योजने अंतर्गत 126 संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ,85 संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत 17 व इतर प्रकरनाना मंजूरी देण्यात आली, अश्या ऐकून 563 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनान्तर्गत 34 लाभार्थयाना चेक देण्यात आले अस्या ऐकून 597 प्रकरणास मंजूरी देण्यात आली,
या बैठकिला तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, नायब तहसीलदार तुलसीदास कोवे, समितिचे अध्यक्ष संजय डोंगरे, राजू लोणारे, भाऊराव ठोम्बरे, सुनील दाभेकर, श्रीहरी सातपुते, सुनील दडमल, स्वनील वासनिक, देवेंद्र गजभीए, जयप्रकाश गेडाम, अजय चौधरी, माधुरी आवरी, आदि उपस्थित होते,