भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा ग्रामीण समितीचे आंदोलनाला पाठिंबा
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी:-वंचित बहुजन आघाडी शाखा दवलामेटी अंतर्गत दारू भट्टी हटाव समिती चा महीला कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन दारू भट्टी बंद करण्याची मागणी करीत दवलामेटी ग्राम पंचायत ला लवकरात लवकर ठराव देण्याची जोरदार मागणी केली.दवलामेटी ग्रामपंचायत परीसरात येणाऱ्या दारू भट्टी मुळे कित्तेक घर उद्ध्वस्त झाले आहेत. या दारू भट्टी लगत काहीच अंतरावर इन्फंट स्कुल, सरोजिनी स्कूल, चर्च आणि बौद्ध विहार आल्याने परीसरात अशांती चे वातावरण तयार झाले आहे.
शिवाय परिसातील गुन्हेगारी घटनांचा सखोल अभ्यास केला तर चोरी, लुटमार, मर्डर सारखा गंभीर व साधरण घटनेतील गुन्हेगार हे ९०% दारूचा नशेत असल्याचे आढळले आहे. परिसरातील महिलान वर होणाऱ्या अत्याचारांवर आळा घालण्यासाठी दारू भट्टी बंद होने अतीशय गरजेचे म्हणूनच आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर ठराव घेऊन हि दारू भट्टी बंद करावी अशी माहिती या वेळीं दारू भट्टी हटाव समिती अध्यक्ष माधुरी खोब्रागडे यांनी दिली.
भारतीय बौद्ध महासभा नागपूर ग्रामीण जिल्हा समीती तर्फे दवलामेटी येथिल इन्फन्ट शाळे जवळ असलेली दारू भट्टी बंद करण्याची मागणी करणाऱ्या *दारू भट्टी हटाव समिती* ला पुर्ण समर्थन जाहीर करतांना भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा ग्रामीण समिती तर्फे आले ले प्रतिनिधी शैलेंद्र जी लामसोंगे यांनी महिला सभेत जाहीर केले.
यावेळी समिती चा अध्यक्ष माधुरी खोब्रागडे, सचिव विद्या गणवीर, कोषाध्यक्ष जोत्सना बेले यांचा मार्गदर्शनात शेकडो महिला पुरुषांचा स्वाक्षरी असलेले निवेदन ग्रामपंचायत सदस्य व तंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाश मेश्राम व ग्राम पंचायत सदस्य रक्षा सुखदेवे यांनी सरवा समक्ष स्वीकार केले.
यावेळी प्रीति वाकडे, श्वेता सुखदेवे, रितू पाटील, प्रज्ञा लोखंडे, सुशिला भोपे, भारती राठी, वनिता बागडे, सुषमा नारनवरे, महानंदा राऊत, सुषमा निमसरकार, सुनंदा सिरसाठ, पंचशील गौरखेडे, माला राऊत व मोठ्या संख्येने दारू भट्टी हटाव समिती सदस्य तसेच वंचित बहुजन आघाडी चा महीला कार्यकर्ते उपस्थित होते.