
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी( प्र) पोलीस स्टेशन वाडी हद्दीत वडधामन्या जवळील नागलवाडी येथील रॉकेट अगरबत्ती कंपनीला ३० एप्रिल ला सकाळी 05:00 वाजता सुमारास आग लागली सविस्तर वृत असे की घटनास्थळ हे अगरबत्ती कंपनी चे उत्पादन होत असलेल्या ठिकाण आहे. फॅक्टरी ही सकाळी नऊ वाजता सुरू होत असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अगरबत्ती प्रोडक्शन चे काम होते. अचानक आगीचा भडका निघत असतांना नागरिकांच्या लक्षात येताच जागृक नागरिकांनी त्वरित वाडी नप.च्या अग्निशमन विभागास घटनेची माहिती दिली,सूचना मिळताच नप. चे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी अग्निशमन अधिकारी गौरव गाणार व रोहित शेलारे यांना घटनास्थळी पोहचण्याचे आदेश दिले.दरम्यान आगीने उग्ररूप धारण केले.
यावेळी अग्निशमन दलाचे वाहक प्रशांत टोंगे,फायरमन अनुराग पाटील,कार्तिक शहाणे, आनंद शेंडे, वैभव कोलास्कार, इंद्रजित इरपती, लक्की सोनकर,पृथ्वी मेश्राम यांनी परिश्रम घेऊन आग विझवली. मात्र आगीचे कारण कळू शकले नाही. सकाळी 5.30 वाजता सुमारास गावातील लोकांना या ठिकाणी आग लागल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी घटना स्थळ गाठून अग्नीशामक दलाला पाचारण केले एकून ६ फायर ब्रिगेडचे गाड्या गोडाऊन ला लागलेली आग घटनास्थळी आल्या व विझविण्याचे काम केले. ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा प्राथमिक आंदाज आहे. गोडाऊन मधील अगरबत्ती तयार करण्यासाठी ठेवलेले कच्चामाल,
भुसा तसेच मशिनरी व अगरबत्ती तयार करण्यासाठी उपयोगात येणारी काळ्या हे सर्व जळून खाक झाले . मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवित झाली नाही. 60 ते 70 लाखाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे कंपनी मालक मेहबूब खान हमीद खान वय 57 वर्ष राहणार गांधी लेआउट गोरेवाडा रोड गिट्टीखदान नागपुर . यांनी सांगीतले . पुढील तपास संबधीत विभाग करित आहे .वाडी पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नवार आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहचले.तर नागपूर मनपा व वाडी नप च्या अग्निशमन दलांनी आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न केले रात्री पर्यंत आग विझविण्याचे कार्य सुरू होते.