
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-गदगाव , कवठाळा, तिरखुरा , गरडापार, माहालगाव का , जामगाव को ते भिसी,चिमूर परिसरातील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी चिमूर येथे दररोज जाणे – येणे करीत असतात. अनेक शेतकऱ्यांना आणि साधारण माणसांना विविध कामासाठी चिमूर मध्ये शासकीय कार्यालये सरकारी दवाखाने पंचायत समिती मध्ये ये जा करावे लागत असते अनेक विद्यार्थी प्रवास पायी व सायकलने करतात, आजू बाजूचा परीसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असल्याने विद्यार्थी , शेतकऱ्यांना प्रवास करताना जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो या परिसरात वन्यप्राणी यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या परिसरात वाघ, अस्वल, डुकर व अन्य जंगली प्राण्यांचा नेहमी धुमाकूळ असतो. तरी विद्यार्थ्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी चिमूर ते कवठाळा, तिरखुरा , गरडापार, माहालगाव, जामगाव भिसी, दैनंदिन पूर्ववत बस सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी बस आगार प्रमुख यांना निवेदनातून केली. निवेदन सादर करताना ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष आशिष बोरकर उपाध्यक्ष जावेद पठाण , अंकित डांगे आदी उपस्थित होते.