
*दारु भट्टी हटाव समिती, वंचित बहुजन आघाडी, बुधघोष महाविहर आणि मानवाधिकार आयोग नागपूर जिल्हा यांनी जिल्हाधिकारी विजया बनकर यांची भेट घेऊन दारू भट्टी बंद करण्याची केली जोरदार मागणी*
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र :- दवलामेटी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राठी ले आऊट येथील देशी दारू भट्टी हटवन्यासाठी आज दिनांक १३ मे शुक्रवार रोजी दारू भट्टी हटाव समिती, वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा, बुधघोष महाविहार व मानव अधिकार आयोग नागपूर जिल्हा यांनी संयुक्त पने जिल्हा अधिकारी विजया बनकर यांना लेखी निवेदन दिले.
तसेच तक्रार करण्यात आली की आमच्या माहिती प्रेमाने या दारू भट्टी ला दवलामेटी ग्राम पंचायत ची NOC नाही या बाबत योग्य सहनिशा प्रशासनाने करावी ग्राम पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याचे सिद्ध झाल्यास ही दारू भट्टी बरेच वर्षा पासून बेकायदेशीर रित्या चालवणाऱ्या मालकावर व व्यवस्थापकावर कायदेशिर कारवाई करून दारू भट्टी नेहमीसाठी बंद करावी अशी मागणी यावेळी समितीचा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
दारु भट्टी ला लागुन इन्फ्रंट शाळ, सरोजनी पब्लीक स्कूल, दृगधामना हायस्कूल, चर्च, बौद्ध विहार, रुग्णालय, आठवडी बाजार व लोकं वस्ती असल्याने हि दारू भट्टी बंद करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य कार्यवाही करून हि दारू भट्टी हटवली नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार असे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विलास वाटकर यांनी सांगितले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर, नागपूर शहर अध्यक्ष रवी शेंडे, प्रवक्ता सूमित गोंडाणे, दारु भट्टी हटाव समिती चा अध्यक्ष माधुरी खोब्रागडे, सचिव विद्या गणवीर, कोषाध्यक्ष जोत्सना बेले, लोखंडे , नारनवरे, प्रीती वाकडे, महानंदा राऊत, लता महेस्कर,साधना नितनवरे, रूपाली गिरी, सुनिता बोरकर, वर्षा जांभुळे दिपक कोरे, अंनवरअली, रोहित राऊत, दर्शन बेले , राहुल पाटील व मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.