
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी सामाजिक, राजकीय तथा व्यावसायिक क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असलेले व सामाजिक जनतेची होईल त्या परीने निष्काम सेवा करणारे प्रशांत धनराज डवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सचिन पाल निवड तर जिल्हा सचिव म्हणून मोनालीताई धोटे यांची निवड करण्यात आली. तिन्ही पदाची निवड बिनविरोध करून चंद्रपूर जिल्ह्याच्या एकीचे चित्र संपूर्ण राज्य संघटनेला दाखविण्यात आले.
संगणक परिचालक यांच्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे नेहमी उभा असणाऱ्या निडर व हिम्मतवान प्रतिनिधीची निवड जिल्हाध्यक्ष म्हणून झाली असल्याने चंद्रपूर जिल्हा संघटनेला विशेषतः आनंद झाल्याचे बघायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे संगणक परिचालक यांच्या समस्याचे नक्कीच निराकरण होईलच असा विश्वास संगणक परिचालक यांचे मनात निर्माण झालेला आहे.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रशांत धनराज डवले यांना चिमूर तालुक्यातून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातुन संगणक परिचालक यांचेकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.