Breaking News

वाडीत एमआयडीसी चौकात अपघात अज्ञात इसम जागीच ठार-अपघात अतीशय भीतीदायक

प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी प्र:-अमरावती महामार्गावर उडाण पुलाचे काम चालू असून , चौकात वाहतूक पोलीस दिसेनासा झाला आहे . सगळा ताफा वाडी पोलीस स्टेशन समोर किंवा 8 वा मैल , भरत नगर वडधामना महामार्गावर सामान्य नागरीकांना वेठीस धरत असून उठ सुठ गाडी चालान करण्याच्या मागे लागल्याचे दिसत आहे . चौक मोकाट आणि गाड्या सुसाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचाच एक परिणाम म्हणून एमआयडीसी चौक जेपी हॉटेल समोरील दिनेश टी स्टॉल च्या बाजूने एका हमाल कामगाराचा जीव गेला .

सविस्तर वृत्त असे की अमरावती महामार्गा वरून ट्रान्सपोर्ट गोडावून मध्ये ट्रक क्रमांक MH21BH2228 जात असतांनी परिसरातील काम करणारा मजूर असल्याचे कळते परंतू त्याची ओळख पटली नाही . अज्ञात इसम ट्रक च्या मागच्या चाकाखाली येवून त्याचे डोके अक्षरशा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाला . परिस्थिती बघता ट्रक ड्रायव्हर गाडी सोडून पसार झाला .

घटनेची माहीती वाडी पोलीस स्टेशन ला मिळताच वाडीचे पी .आय . प्रदिप रायन्नवार तातडीने घटना स्थळी पोहचून परिस्थिती हाताळली . अज्ञात इसमाचे शव उत्तरीय तपासनीसाठी शासकीय रुग्नालय नागपूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास वाडी पोलीस करित आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधिर विद्यालय येथे दिव्यांग दिन साजरा

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नये, मुलांना साथ दया असे आवाहन पालकांना – तहसीलदार …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पेण-खोपोली रोड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील बाधितांना मोबदला

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved