
झाडांची जोपासना करने माझे व प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : सरपंच रीता ताई उमरेडकर
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-सुर्याचा रौद्र रूप, कडकं उन्हा मुळे गावातील झाडे वाळत आहेत असे लक्षात येताच दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच रीता ताई उमरेडकर यांनी पाण्याचे टँकर बोलाऊन आपल्या ग्राम पंचायत सदस्यांना सोबत घेऊन स्वतः झाडांना पाणी दीले व गावातील नागरिकांना संदेश दिला की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी मिळून या कडक उन्हा पासुन झाडाचे स्वसंरक्षण करने अतीशय गरजेचे आहे.
रोजगार हमी योजने अंतर्गत काही महिलांना नियमित झाडांच्या देखरेखी साठी कामावर ठेवले आहे परंतू सध्या तापत आसलेल्या कडक उन्हामुळे झाडे वाळत आहेत असे आमचा लक्षात आले असता आम्ही स्वतः काही सदस्यांना सोबत घेऊन झाडांना पाणी देण्यास सुरवात केली असे दवलामेटी चा सरपंच रीता ताई उमरेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी सरपंचाच्या सोबत ग्राम पंचायत चे वरिष्ठ सदस्य तसेच तंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाश मेश्राम, श्रीकांत रामटेके, रक्षा सुखदेवे, अर्चना चौधरी, सामजिक कार्यकरते दिपक कोरे व ग्रामपंचायत चे कर्माचारी उपस्तित हो ते.