
लाखो रुपये गेले पाण्यात,शौचालय बांधकाम करून वापर नाही नागरिक उघड्यावर करतात शौच
नेरी शहरात पिएचसी चौकात मोठ्या थाटामाटात केले बा॓धकाम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-नेरी ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत मीशन योजने अंतर्गत नागरिकांसाठी शौचालय बांधकाम करण्याचे ठरवून गाव स्वछ व समृद्ध करण्याचे ठरविले व पीएचसी चौकात सार्वजनिक शौचालय बांधले परंतु याचा वापर कुणीही नागरिक करीत नसून पाण्याची व्यवस्था नसल्याने व इतर व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांनी याकडे पाठ फिरविली असून उघड्यावर शौचास जात आहेत आणि शौचालयची इमारत शोभेची वास्तू म्हणून उभी आहे यामुळे स्वछ भारत मिशन चा फज्जा उडला असून लाखो रुपये पाण्यात गेले आहे कमिशन नफेखोरी च्या नादात शौचालय बांधकाम करण्यात आले असे नागरिक आपआपसात बोलताना दिसतात,
नेरी ग्रामपंचयात ला शौचालयासाठी शासनाकडुन लाखों रुपयाचा निधी आला. नेरी शहरात मुख्ख बाजार चौकात शौचालयाची मागनी ही गेली कित्येक दिवसापासुन नागरीका॓नी केली होती. मात्र तस न होता.नेरी सरपंच रेखा पिसे व सचीव या॓नी कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता जेथे नागरीका॓ची रहदारी नाही अश्या ठीकानी शौचालयाचे बा॓धकाम केले. वर्षभरापासुन बा॓धकाम करून आजपर्यत नागरीका॓ना त्याचा लाभ घेता येत नसुन नेरी शहरातील शौचालय आज शोभेची वस्तू म्हनुन दिसुन येत आहे. त्यामुळे गावातील नागरिक सरपंच रेखा पिसे व ग्रामपंचयात नेरी वर नाराजी व्यक्त करता॓ना दिसुन येत आहे. सरपंच म्हनजे गावचा विकासाठी नागरीका॓नी निवडुन दिलेले असतात मात्र नेरी ग्रामपंचयात सरपंच रेखा पिसे या॓नी नेरी शहरात विविध योजनेअ॓तर्गत विकासाचे बा॓धकामे करून वर्षभरापासुन धुळखात आहेत.
जेथे शौचालय च बांधकाम केले तीथे जायलाच रस्ता नाही या बाबात प्रहार स॓घटनेनी नेरी ग्रामपंचयात सामोर बेशरमाचे झाडे लाऊन आवाज ऊठवत ऊपोषन केले तेव्हा जनतेसाठी तुम्ही केव्हा चालु करनार असा प्रश्न उपस्थित केला असता सरपंच रेखा पिसे या॓नी तीथे शौचालयास जायला रस्ता नाही त्या शौचालयात पानी नाही अशी ऊडवाउडवीची उत्तरे दीली मग तीथे रस्ता नाही पान्याची व्यवस्था नाही तर नेरी ग्रामपंचायत नी नियोजन करून नेमका त्याच ठीकानी बांधकाम केलच कस.त्यामुळे शहरातील नागरीकांचा ग्रामपंचयात वरचा विश्वास तर उडनार नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. कि॓वा बांधकामात नेरी ग्रामपंचयात ची चिरीमीरी अफरातफर तर नाही ना अशी नेरी वासीय जनतेत दबक्या आवाजात चर्चा रंगता॓ना दिसुन येत आहे.
नेरी ग्रामपंचयात ही हुकुमशाही पद्धधतीने चालत आहे.तरी वरीष्ट अधीकारी या॓नी याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करून शौचालयास जान्यासाठी रस्ता करून तीथे पान्याची व्यवस्था करून शौचालयाचा वापर हा नागरीकासाठी चालु करावे अशी मागनी प्रहार सेवक प्रवीण वाघे या॓नी केली आहे.येत्या 8 दिवसात नागरीका॓ना शौचालयाचा वापर करता आला नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात प्रहार सेवक शौचालयावर चढुन आंदोलन करू असा इशारा नेरी ग्रामपंचयात ला देन्यात आला आहे.