
शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांचे खेळाडूंनी मानले आभार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-वरोरा येथील साक्षी पर्बत व पायल येरणे या दोन खेळाडूंनी नेपाळला जाऊन सिल्वर पद मिळवले.तरी या दोन खेळाडूंना शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आर्थिक मदत केली होती.त्यामुळे साक्षी पर्बत व पायल येरणे या दोन्हीही खेळाडूंनी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांचे आभार व्यक्त केले,
तसेच ज्या खेळाडूंनी नेपाळ येथे जाऊन कास्यपदक,सिल्वर पदक व गोल्ड पदक मिळवले अश्या खेळाडूंचे शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या,
त्यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा चिटणीस मनीषभाऊ जेठानी, शिवसेना नगरसेवक दिनेशभाऊ यादव, शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, उपशहर प्रमुख गजूभाऊ पंधरें, सेनसाई रवीभाऊ चरूरकर, शिवसैनिक अतुलभाऊ नांदे उपस्थित होते.